पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये राहत असलेल्या भारतीयांना व्हीझाचे नियम सोपे करण्यात आले आहेत. हिंदू, पारसी, बौद्ध, ख्रिश्चन धर्मातील अल्पसंख्यांकासाठी व्हीझाच्या अटी सोप्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.
कॅबिनेटमधील महत्वाचे निर्णय
- पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील भारतीयांना व्हीझाचे नियम सोपे.
- एनबीसीसी इंडिया कंपनीतील 15 टक्के हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी.
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी 12 हजार कोटींची तरतूद. एक कोटी तरुणांना येत्या 4 वर्षात प्रशिक्षण
- पूसा येथील राजेंद्र सेंट्रल अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचं नामांतर डॉ. राजेंद्र प्रसाद सेंट्रल अग्रीकल्चर युनिव्हर्सिटी
https://twitter.com/rsprasad/status/753163377753649152