श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या माछिलमध्ये भारतीय सेना पाकिस्तानी लष्कराच्या नापाक कारवायांना सडेतोड उत्तर देत आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देत तीन पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला आहे. यामध्ये कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाककडून पूंछमधील केजी सेक्टर, कुपवाडामधीर केरन सेक्टर आणि राजौरीमधील मंजाकोट आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.

पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात काल तीन भारतीय जवान शहीद झाले होते. त्याचाच भारताने आज सडेतोड बदला घेतला. पाकिस्तानने काल भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही केली होती.

दरम्यान पाकिस्तानच्या या हल्लाला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं इंडियान आर्मीने कालच ठणकावलं होतं. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.

पाकच्या हल्ल्यात 3 जवान शहीद, जवानांच्या मृतदेहांची पाककडून विटंबना