श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आज सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या 30 ते 40 ठिकाणी गोळीबार केला. आरएसपुरा ते रामगढ सेक्टरपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार होत होता. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला.


दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान सुरेश शहीद झाले. शिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत तीन पाकिस्तानी जवानांना ठार केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून अत्याधुनिक शस्त्रांद्वारे गोळीबार करत होतं. त्यावेळी भारतानेही पाकिस्तानच्या काही चौक्या आणि बंकर नेस्तनाबूत केल्या.

पाकिस्तानाल ज्याप्रकारे भारताने प्रत्युत्तर दिले, त्यावरुन एक संदेश दिला गेला की, सीमेपलिकडून गोळी आल्यास, त्याचे उत्तरही गोळीनेच दिले जाईल.

कधी सुधारणार पाकिस्तान?

2017 मध्ये पाकिस्तानने तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तरादाखल भारताकडून केलेल्या कारवाई पाकिस्तानचे 138 जवान ठार झाले. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येतो. पाकिस्तानकडून आतापर्यंत 310 वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.