दुसऱ्या क्रमांकावर तीन मुली आहेत. यामध्ये हरियाणाची भाव्या, ऋषिकेशमधील गौरंगी चावला आणि रायबरेली येथील ऐश्वर्या या तिघींनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सीबीएसई परीक्षेचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. सीबीएसईचा विभागवार निकाल पाहिला तर त्रिवेंद्रम विभागाचा पहिला क्रमांक लागतो. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल 98.4 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल चेन्नई विभागाचा क्रमाक आहे. चेन्नई विभागाचा निकाल 91.87 इतका आहे. (चेन्नई विभागात महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे) मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 9 ट्कके चांगला असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
पहिला क्रमांक मिळवणाऱ्या हंसिकाने एबीपी न्यूजशी बातचित करताना सांगितले की, तिला सायकॉलॉजी, इतिहास, म्युझिक वोकल आणि पॉलिटिकल विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत, तर इंग्रजीमध्ये तिला 99 गुण मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे हंसिकाने कोणत्याहा खासगी क्लासेस अथवा शिकवणीशिवाय पहिला क्रमांक पटकावला आहे. हंसिकाला आयएफएस अधिकारी व्हायचे आहे. हंसिकाचे वडील राज्यसभा सचिवालयात काम करतात आणि तिच्या आई प्राध्यापिका आहेत.