मुंबई : किलो-क्लास  पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयने नेव्ही कमांडर, दोन निवृत्त अधिकारी आणि दोन इतर खाजगी व्यक्तींना अटक केली आहे. माहिती लीकची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी नेव्हीने  या प्रकरणाची व्हाईस अॅडमिरलच्या नेतृत्वाखाली अंतर्गत चौकशी देखील करत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते आणि माहिती लीक प्रकणात  परदेशी गुप्तचर संस्थांचा सहभाग होता की नाही हे अद्याप अस्पष्ट झालेले नाही


मुंबई येथे वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये कमांडर रँकपदी कार्यरत असलेले एक जण आणि इतर दोन निवृत्त अधिकारी व इतर दोन जण असे एकूण पाच जणांना सीबीआयने या प्रकरणात अटक केली आहे. हे पाचही जण न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने दिल्ली, नोएडा, मुंबई आणि हैदराबादसह 19 ठिकाणी झडती घेतली असून काही कम्प्युटर आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. तपास यंत्रणेने आरोपींच्या संपर्कात असलेल्या अनेक कार्यरत अधिकाऱ्यांचीही चौकशी केली आहे.


नेव्हीने या सगळ्या प्रकरणावर बोलताना, “प्रशासकीय आणि व्यावसायिक स्वरूपाची कथित माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. नौदलाच्या पूर्ण पाठिंब्याने योग्य सरकारी एजन्सीद्वारे याची चौकशी केली जात आहे. नेव्हीचा चौकशीला पूर्ण पाठींबा असेल"


नेव्हीने आपल्या आठ जुन्या सिंधुघोष- क्लास, डिझेल-इलेक्ट्रिक सबमरीनपैकी चार अपग्रेड करण्याचे काम केले जात आहे.  प्रत्येकाची किंमत सुमारे 1,400 कोटी रुपये आहे. रशिया तसेच भारतामध्ये हे काम होत आहे आणि याच संबंधीची माहिती लिक झाल्या प्रकरणात हे कारवाई करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या :