Income Tax Returns Extension: सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची तारीखही वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 30 सप्टेंबर होती. करदात्यांना होत असलेल्या समस्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, आयकर विभागाने गुरुवारी संध्याकाळी याबाबत माहिती दिली.
आयकर विभागाने ट्वीट करत म्हटलं की, इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर अधिनियम 1961 अंतर्गत वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न (आयटीआर) आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करताना करदात्यांनी नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने इनकम टॅक्स रिटर्न आणि ऑडिट रिपोर्ट भरण्याची मुदत वाढवली आहे.
मागील वर्ष 2020-21 साठी कायद्याच्या कलम 92E अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहारात किंवा राष्ट्री व्यवहारामध्ये व्यक्तींद्वारे लेखापालकडून अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख आता 31 जानेवारी, 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अधिनियम कलम 139 च्या उप-कलम (4) / उप-कलम (5) अंतर्गत, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी उत्पन्नाचे विलंबित / सुधारित विवरणपत्र सादर करण्याची नियत तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.