नवी दिल्ली : गुप्त मार्गाने आणि अवैध्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या शेकडो राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रेटींची नावं पँडोरा पेपर्सच्या माध्यमातून उघडकीस आली आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि काही भारतीय राजकारण्यांची नावं असल्याची चर्चा आहे. या घटनेची गंभीर दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. पँडोरा पेपर्स लीक संबंधित तपास करण्यासाठी केंद्र सरकारने मल्टी एजन्सी ग्रुपची स्थापना केली आहे. 


पॅंडोरा पेपर्स लीकचा तपास हा मल्टी एजन्सी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्याच्या प्रमुखपदी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे (CBDT)अध्यक्ष असतील. या मल्टी एजन्सी ग्रुपमध्ये प्रत्यक्ष कर बोर्ड, आरबीआय आणि फायनान्शियय इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्या-त्या विभागाशी संबंधित संस्था या पँडोरा पेपर्स लीकचा तपास करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 


काय आहे प्रकरण? 
जगभरातील शोधपत्रकारांच्या टीमचा समावेश असलेल्या पँडोरा पेपर्सने लाखो कागदपत्रांचा अभ्यास करुन अवैध्य मार्गाने श्रीमंत बनलेल्या अब्जाधीशांची नावं उघड केली आहेत. या यादीत जगभरातल्या सध्याच्या 35 सत्ताधाऱ्यांची आणि 300 हून अधिक सेलिब्रेटींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय स्टार खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. सचिनच्या नावासोबतच देशातील सहा मोठ्या राजकारण्यांची नावंही या यादीमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. 


The International Consortium of Investigative Journalists (ICIJ) या शोधपत्रकारांच्या एका टीमने 1.19 कोटी कागदपत्रांचा अभ्यास केला असून त्यामधून गुप्त पद्धतीने झालेले आर्थिक व्यवहार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. या टीममध्ये बीबीसी, द गार्डियन तसेच भारतातील इंडियन एक्सप्रेस या सोबत जगभरातल्या 150 माध्यमांचा समावेश आहे. 


 



महत्वाच्या बातम्या :