नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अखेर कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत सोनिया गांधींना पत्र पाठवले  आहे, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी कॉंग्रेस सोडणार असल्याचे सांगितले होते. अखेर आज अधिकृतकित्या त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. 


कॅप्टन अमरिंदर नवीन पक्षाची स्थापना करणार आहे. 'पंजाब लोक काँग्रेस' असं  या पक्षाचं नावाची घोषणा करण्यात आली आहे.  तीन नावांचा प्रस्ताव आयोगाकडे दिला होता त्यापैकी 'पंजाब लोक काँग्रेस'  नाव मंजूर करण्यात आले आहे.


BLOG | कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेस फोडणार?


पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह यांच्याबरोबरील वादानंतर कॅपटन अमरिंदर सिंह यांनी 18 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंत सिंह म्हणाले होते की, कॉंग्रेसने त्यांचा अपमान केला आहे. मी लवकरच पक्ष सोडणार आहे. पुढील राजकीय वाटचालीबद्दल केलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, मी माझ्या मित्रांबरोबर आणि जवळच्या लोकांबरोबर चर्चा करणार आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी नव्या पार्टीची घोषणा केली.



माजी मुख्यमंत्रीने 30 ऑक्टोबरला सांगितले की, मी लवकरच स्वत:चा पक्ष स्थापन करणार आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सुटल्यानंतर पंजाब विधानसभा निवडणूक 2022 करता भाजप यांच्या युतीबद्दल मी भाष्य करणार आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत.