झाकीर नाईकवर दाखल असलेल्या 2005 आणि 2012 च्या गुन्ह्यांना आधारभूत मानून कायदा मंत्रालयाने केंद्र सरकारला या संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या अगोदरच सरकारने या संस्थेच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली होती.
इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवरील आरोप
गृह मंत्रालयानेही या संस्थेला बेकायदेशीर घोषित करुन त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. 1991 पासून झाकीर नाईकची इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेवर धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि आयसिसमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणे, असा आरोप आहे.
यापूर्वी सरकारने संसदेत या संस्थेविषयी स्पष्टीकरण देताना 55 दहशतवादी झाकीरच्या भाषणांनी प्रेरित झाले असल्याचं सांगितलं होतं.
कोण आहे झाकीर नाईक?
बांगलादेशातील दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर नाईकचं नाव चर्चेत आलं. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या झाकीरचे लक्ष धर्मप्रचारात जास्त असल्याने त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची स्थापना केली. त्याने जगभरात 2000 हून जास्त व्याख्यानं दिली आहेत. यात 2012 मध्ये बिहारमधील किशनगंजच्या सभेवेळी 10 लाखांपेक्षा जास्त लोक त्याच्या भाषणाला हजर होते, असा दावाही त्याने केला आहे.
संबंधित बातम्या :