Tejas 2.0 Mega Project : संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढणार आहे. तेजस-1 या लढाऊ विमानाच्या यशानंतर आता भारत सरकारने आता तेजसच्या 2.0 मेगा प्रोजेक्टला मान्यता दिली आहे. याअंतर्गत तेजसचे अधिक सक्षम आणि शक्तिशाली व्हर्जन तयार केले जाणार आहे. तेजस 2.0 मेगा प्रोजेक्ट अंतर्गत 5 व्या पिढीचे फायटर जेट बनवले जाईल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने 6,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रोटोटाइप, फ्लाइट टेस्ट आणि सर्टिफिकेशनसाठी तेजस मार्क-2 विकसित करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी अडीच हजार कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. 'सुपर क्रूझ' क्षमता असलेल्या या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मंजूरी मिळण्यासाठी काही महिने लागतील.  


तेजस मार्क-2 मध्ये बसवलेले 98 किलोन्यूटन थ्रस्ट क्लासचे शक्तिशाली GE-414 इंजिन तेजसची लढण्याची क्षमता वाढवते.  याशिवाय हे तेजस मार्क-1 (GE-404 इंजिन) पेक्षा जास्त शस्त्रे वाहून नेऊ शकते. त्यामुळे तेजस मार्क-2 चे वजन तेजस मार्क-1 पेक्षा किंचित जास्त असेल. तेजस मार्क-1 हे 13.5 टन आहे. तर मार्क-2 17.5 टन आहे.


तेजस मार्क-1 देखील अडव्हान्स असून ते वजनाने खूपच हलके आहे. हवाई दलाला मिग-21, मिराज-2000, जग्वार आणि मिग-29 सारख्या लढाऊ विमानांच्या जागी तेजस मार्क-1 आणायचे विचार सुरू होता. 


IAF मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "हलके वजनाचे तेजस मार्क-1 हे प्रामुख्याने हवाई संरक्षणासाठी आहे. मध्यम वजनाचे मार्क-2 तेजस त्याच्या जड श्रेणीतील स्टँडऑफ शस्त्रे लढण्यास सक्षम आहे. भारतीय वायुसेनेने आतापर्यंत हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून मागवलेल्या 123 तेजस विमानांपैकी 30 विमानांचा समावेश केला आहे. 46,898 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. 2024-2028 या कालावधीत दहा प्रशिक्षकांच्या वितरणासाठी फेब्रुवारी 2021 मध्ये हा करार करण्यात आला आहे. 


DRDO आणि एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एजन्सीला दोन ते तीन वर्षात पहिले उड्डाण करायचे आहे, ज्याचे उत्पादन 2030 च्या आसपास सुरू होईल. सध्या आयएएफला आपल्या फायटर स्क्वॉड्रन्सची संख्या वाढवण्यासाठी तेजस जेटची नितांत गरज आहे, जी सध्या 32 पेक्षा कमी आहे. तर चीन आणि पाकिस्तानकडून सततच्या धमक्यांसाठी किमान 42  विमानांची गरज आहे.