देहरादून: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. धारासूच्या पुढे 11 किलोमीटर पुढे नालूपानी इथं भागीरथी नदीत ही बस कोसळल्याची माहिती समजते आहे.


या बसमध्ये जवळपास 29 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील सुमारे 22 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात 8 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व प्रवासी मध्य प्रदेशातल्या इंदूरचे असल्याचं समजतं आहे.

या अपघातातील मृतदेह मध्यप्रदेशमध्ये नेण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचेही आदेश दिेले आहेत. दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री त्रिवेद सिंह यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजाराच्या मदतीची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी बसमध्ये 28 प्रवासी होते. गंगोत्रीहून परतत असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी थेट नदीत कोसळली.