नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी बुलेट ट्रेनच्या तिकीट दराबाबत माहिती दिली. पण हे दर सध्याच्या खर्चावर आधारित असल्याची माहिती त्यांनी दिली.
बुलेट ट्रेन तिकिटाचे संभाव्य दर
- मुंबई-अहमदाबाद - 3000 रुपये
- बीकेसी-ठाणे - 250 रुपये
- मुंबई-अहमदाबाद (बिजनेस क्लास) - 3000 रुपयांहून अधिक
- एका बुलेट ट्रेनमध्ये 10 डब्बे असतील. ज्यामध्ये एक बिजेनस क्लास असेल.
बुलेट ट्रेन प्रकल्पात 24 ट्रेन्स येणार आहेत. सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनवण्यात येणार आहेत. दहा डब्यांच्या ट्रेनची आसन व्यवस्था 750 इतकी असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसनं असतील.
2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
कोणकोणत्या सुविधा
- उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
- महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहं
- प्रवासी आजारी असल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
- डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
- स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
- स्वयंचलित ब्रेक यंत्रणा
संबंधित बातम्या :
बुलेट ट्रेनला दिव्यात पहिला ब्रेक, जमीन देण्यास गावकऱ्यांचा विरोध