VIDEO : उंदरांमुळे तीन मजली इमारत कोसळली!
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2018 10:47 AM (IST)
इमारतीची अवस्था जर्जर झाल्यानं काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती.
आग्रा (उत्तर प्रदेश) : आग्रा शहरातील तीन मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डोळ्यांदेखत इमारत जमीनदोस्त होताना या व्हिडीओमध्ये दिसते. विशेष म्हणजे उदरांमुळे ही इमारत कोसळली आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत कोसळली. सुदैवाने इमारतीतल्या लोकांनी वेळीच इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली. इमारतीची अवस्था जर्जर झाल्यानं काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती. सुधीर वर्मा असं या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. पाहा व्हिडीओ :