नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून देशात सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पातून लोकांना खूप आशा आहेत. कारण, कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सीव्होटरने अर्थसंकल्पापूर्वी सर्व्हेक्षण केलं आहे. ज्यामध्ये लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे की या अर्थसंकल्पात कोरोना लस प्रत्येक नागरिकास मोफत देण्याची सरकारने घोषणा करावी का?


कोरोना महामारीमुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठी खूप अडचणींचे ठरले आहे. दरम्यान, एबीपी न्यूज-सीव्होओटरमध्ये मोफत कोरोना लसीबद्दलही लोकांवर प्रश्न विचारला गेला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकार सर्वांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करू शकते का? यावर, 73.1 टक्के लोकांनी हो उत्तर दिले आहे.


मोफत लस
लोकांना मोफत लस मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. सर्व्हेक्षणात एकूण 73.1 टक्के लोकांनी म्हटले आहे की होय, ते अर्थसंकल्पात सरकारकडून या घोषणेची अपेक्षा करत आहेत. त्याच वेळी, 22.4 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की सरकारने या बजेटमध्ये प्रत्येक नागरिकास दिलेली कोरोना लस विनामूल्य जाहीर करू नये.


त्याचवेळी 4.4 टक्के लोकांनी या विषयावर बोलणे टाळले आहे. अर्थसंकल्प 2021 च्या आधी हे सर्व्हेक्षण एबीपी न्यूजने सीव्होटरच्या सहकार्याने केले आहे. यासाठी 1524 लोकांशी चर्चा करण्यात आली.