नवी दिल्ली : खासदार ई अमहद यांच्या निधनानंतरही केंद्रीय अर्थसंकल्प आजच सादर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ई अहमद यांच्या निधनामुळे बजेट सादर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

अर्थसंकल्प : जेटलींच्या पोटलीतून देशाला या 10 गोष्टी मिळणार?


 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, कारण नोटाबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली जनतेला काय देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

खासदार ई अहमद यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन


राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान अहमद यांना हार्ट अटॅक


अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणादरम्यान ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ई अहमद यांना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. परंतु रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बजेट सादर होणार की नाही याबाबत अनिश्चितता होती.

अर्थसंकल्प सादरीकरणावर प्रश्नचिन्ह


काय आहे सभागृहाची परंपरा?

अधिवेशनादरम्यान लोकसभा किंवा राज्यसभा सभासदाचं निधन झाल्यास श्रद्धांजली देऊन संबंधित सभागृहाचं कामकाज एका दिवसासाठी स्थगित करण्याची परंपरा आहे.

आर्थिक सर्व्हे : विकास दर 6.75 ते 7.50 टक्के राहण्याचा अंदाज


...म्हणून आजच अर्थसंकल्प सादर होणार!

परंतु केंद्रीय अर्थसंकल्प रात्री 2 वाजता प्रिंट झाला आहे. त्यामुळे जर आज बजेट सादर झाला नसता तर कर्मचाऱ्यांना आणखी 24 तास वाट पाहावी लागली असती. अशा परिस्थिती बजेट लीक होण्याची शंका सरकारला होती. बजेटमधील एका निर्णयावर कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे खासदार ई अहमद यांच्या निधनानंतरही अर्थसंकल्प सादर होणार असल्याचं समजतं.

देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?


लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर आधी ई अहमद यांना श्रद्धांजली वाहून अर्थसंकल्प सादर केला जाईल, असं सूत्रांचं म्हणणं आहे.