बसपाला दिलेलं मत भाजपला, ईव्हीएम घोळाचा व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2017 10:12 PM (IST)
मेरठमध्ये बसपाला मत दिल्यानंतरही भाजपलाच मत जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकांच्या तोंडावर ईव्हीएम मशिनच्या घोळावरुन भाजपला पुन्हा एकदा टीकेचं धनी व्हावं लागत आहे. उत्तरप्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा घोळ झाल्याचा आरोप होत आहे. मेरठमध्ये बसपाला मत दिल्यानंतरही भाजपलाच मत जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याआधी उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूक तसंच महाराष्ट्रातीलही काही निवडमुकांमध्ये ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप होत होता. राज्यातही भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला लक्ष्य केलं होतं. दरम्यान ईव्हीएममध्ये घोळ होता, मात्र मत भाजपला गेलं नाही, असा दावा उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे भाजपला आता पुन्हा एकदा गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर टीकेचा सामना करावा लागणार आहे. पाहा व्हिडिओ :