लखनौ : बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण, उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या दोन जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत बसपा समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार आहे. त्या बदल्यात सपा मायावतींना राज्यसभेसाठी मदत करेन, असा निर्णय घेण्यात आला.
पोटनिडवणुकीत बसपा आपले उमेदवार देणार नाही. तर भाजपचा पाडाव करण्यासाठी अन्य तुल्यबळ उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहनही मायावती यांनी बसपा कार्यकर्त्यांना केलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात 2019 च्या निवडणुकांमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, मायावती यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला.
पाठिंबा हा केवळ पोटनिवडणुकीसाठीच आहे, लोकसभा निवडणुकीचा विचार झालेला नाही, असं मायावतींनी स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणाऱ्या गोरखपूर आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या फूलपूर लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात आल्यानंतर दोघांनीही खासदारकीचा राजीनामा दिला होता.
तब्बल 25 वर्षांनंतर सपा आणि बसपा या दोन पक्षांमध्ये ताळमेळ बसला आहे. मात्र दोन्ही पक्षांचे नेते व्यासपीठही शेअर करणार नाहीत किंवा सोबत प्रचारही करणार नाहीत. शिवाय ही कायमची युती नसल्याचंही मायावतींनी स्पष्ट केलं आहे.
'सपा'ला पोटनिवडणुकीत मदत करुन मायावती राज्यसभेवर जाणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2018 11:29 PM (IST)
पोटनिडवणुकीत बसपा आपले उमेदवार देणार नाही. तर भाजपचा पाडाव करण्यासाठी अन्य तुल्यबळ उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहनही मायावती यांनी बसपा कार्यकर्त्यांना केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -