तिरुअन्नामलाई (तामिळनाडू) : एआयएडीएमकेचे स्थानिक नेते कनकराज यांची हत्या झाली आहे. काल सकाळी 7 वाजता हत्येची घटना घडली असून, घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपींनी हत्येनंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.
बॅडमिंटन खेळून परतत असताना कनकराज यांची हत्या करण्यात आली. तिघांनी कनकराज यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करु हत्या केली.
मुख्य आरोपी बाबूच्या माहितीनुसार, कनकराज यांची हत्या अंतर्गत वादातून झाली. आरोपी बाबू हा कनकराज यांच्यासाठीच काम करत होता.
धक्कादायक म्हणजे, ज्या ज्या लोकांवर कनकराज यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे, ते सर्व एआयएडीएमकेशीच संबंधित आहेत. त्यामुळे हत्येचं गूढ वाढलं आहे.
कनकराज हे तिरुअन्नामलाईमध्ये एआयएडीएमकेचे डिस्ट्रिक्ट अकाऊंट सेक्रेटरी होते.
https://twitter.com/Madrassan/status/830710892626997249