नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तात्काळ कोट्यातील तिकिटांसंबंधी नवी घोषणा केली. आता प्रवासी रेल्वेच्या तात्काळ कोट्यातील तिकीट बुक करुन पेमेंट नंतर करु शकतात. ही सेवा आतापर्यंत केवळ सर्वसामान्य तिकिटांच्या बुकिंगसाठीच उपलब्ध होती.
तात्काळ तिकिटसंदर्भातील हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया अत्यंत वेगवान होईल.
आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपवर यूझर्स आपल्या घरातूनच तिकीट बुक करुन डिलिव्हरीचा पर्याय निवडून कॅश किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करु शकतात. आयआरसीटीसीच्या ‘पे ऑन डिलिव्हरी’ पेमेंट प्रोव्हायडर एन्ड्युरिल टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत घोषणा केली.
आयआरसीटीसीच्या माध्यमातून दररोज 1 लाख 30 हजार तिकिटांची देवाण-घेवाण होते आणि यामध्ये अधिकाधिक तिकिटं तात्काळसाठी बुकिंग सुरु होण्याआधीच काही मिनिटांत बुक होतात. आतापर्यंत तिकीट कन्फर्म होण्याआधीच यूझर्स आयआरसीटीसीच्या माध्यमातून ‘गेटवे’द्वारे पेमेंट करतात. या प्रक्रियेसाठी काही मिनिटांचा कालावधी जातो. त्यामुळे अनेकदा यूझर्सना कन्फर्म तिकीट बुक करताच येत नाही.
‘पे ऑन डिलिव्हरी’ सेवेमुळे ‘गेटवे’ची गरजच भासणार नाही. शिवाय, यूझर्स काही सेकंदात तिकीट बुक करु शकतात. त्यामुळे तात्काळ कोट्यातून कन्फर्म तिकीट बुकिंगची शक्यता वाढते.
एन्ड्युरल टेक्नोलॉजिचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग वाजपेयी यांच्या यांनी यासंदर्भात सांगितले, “तात्काळ तिकिटांटी ‘पे ऑन डिलिव्हरी’ लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना तात्काळ कोट्यातून बुकिंग करण्याची गरज भासते. त्यामुळे तात्काळ तिकीट बुक करताना प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, तिकीट बुक करुन नंतर पेमेंट करण्याचा पर्याय मोठ्या संख्येत प्रवासी अवलंबतील.”
आधी तात्काळ तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2017 03:04 PM (IST)
भारतीय रेल्वेने तात्काळ कोट्यातील तिकिटांसंबंधी नवी घोषणा केली. आता प्रवासी रेल्वेच्या तात्काळ कोट्यातील तिकीट बुक करुन पेमेंट नंतर करु शकतात. ही सेवा आतापर्यंत केवळ सर्वसामान्य तिकिटांच्या बुकिंगसाठीच उपलब्ध होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -