IRCTC Railway Ticket Booking: भारतात प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते. सण-उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने नवीन सुविधा सुरू केली आहे. या नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना एकही पैसा न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहे. ''ट्रॅव्हल नाऊ अॅण्ड पे लेटर' अशा या नव्या खास सुविधेचे नाव आहे. ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट अॅपवरही उपलब्ध आहे.   'Travel Now Pay Later' ची सुविधा देण्यासाठी IRCTC ने CASHe सोबत भागिदारी केली आहे. 


तिकीट बुकिंगनंतर सहा महिन्यांनी भरता येतील पैसे


दिवाळीनिमित्त तुम्ही घरी, पर्यटनासाठी प्रवास करणार असाल तर 'Travel Now Pay Later' या खास सुविधेचा वापर करता येईल. अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा स्थितीत 'Travel Now Pay Later' चा वापर करता येईल.


या नव्या सुविधेमुळे प्रवासी तिकीट बुक करू शकतात. तुम्ही CASHe चा पर्याय वापरून EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक शकता.  विशेष म्हणजे CASHe च्या माध्यमातून 'Travel Now Pay Later' साठी साधारण आणि तात्काळ तिकीट बुक करू शकता. तिकीटासाठीची रक्कम ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकता. या सु्विधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही. 


CASHe चे चेअरमन व्ही. रमन कुमार यांनी सांगितले की,  IRCTC च्या 'रेल कनेक्ट' अॅपच्या माध्यमातून 'Travel Now Pay Later' ही सुविधा संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे.  या अॅपच्या माध्यमातून देशभरात जवळपास 15 लाख लोक तिकीट बुक करतात. 


अॅप असे करा डाऊनलोड


IRCTC चे रेल कनेक्ट हे अॅप तुम्हाला प्ले स्टोअरमधून डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर काही सोप्या पद्धती फॉलो करून तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येईल.