Sikander Bakht Daughter : पाकिस्तानी (Pakistan) चिमुकलीला भारतात जीवनदान मिळालं आहे. पाकिस्तानी चिमुकलीवर भारतात यशस्वी बोन मॅरो ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया (Bone Marrow Transplant) पार पडली आहे. पाकिस्तानमधील दोन वर्षांच्या मुलीवर बंगळूरूमध्ये बोन मॅरो ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया (BMT Transplant) पार पडली. या चिमुकलीचं नाव अमायरा (Amyra Sikander Bakht) असून ती माजी पाकिस्तानी क्रिकेट आणि कमेंटेटर सिकंदर बख्त (Sikander Bakh) यांची मुलगी आहे. अमायरावर बंगळूरू येथील नारायणा हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. अमायराची तब्येत सध्या ठिक आहे. अमायरावर अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजेच बोन मॅरो ट्रांसप्लांट झालं आहे.
अमायराला म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस हा दुर्मिळ आजार
सिकंदर बख्त यांचं कुटंब पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी आहे. बख्त यांची मुलगी अमायरा सध्या अडीच वर्षांची आहे. अमायरा हिला बंगळूरू येथील नारायणा हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अमायराला अत्यंत दुर्मिळ आजार आहे. अमायरावर बोन मॅरो ट्रांसप्लांट रेयर डिसऑर्डर - म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस टाइप -1 (MPS I) या आजारवर उपचार सुरु होते. म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस (Mucopolysaccharidosis Type-1) हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. हा आजार रुग्णाच्या डोळ्यांवर आणि मेंदूसह शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करतो. हा आजार असणारी बहुतेक मुलांना वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत अपंगत्व येतं. त्यानंतर मृत्यूचा धोकाही असतो.
माजी पाकिस्तानी क्रिकेट आणि कमेंटेटर सिकंदर बख्त
काय आहे म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस? (What is Mucopolysaccharidosis?)
नारायणा हेल्थकेअरच्या अध्यक्षा आणि संस्थापक देवी शेट्टी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली की, 'म्युकोपोलिसेकेरिडोसिस ही एक दुर्मिळ आजार आहे. हा डोळे आणि मेंदूसह शरीराच्या अनेक भागांच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. म्युकोपोलिसॅकरिडोसिस आजारात शरीरातील एक उत्प्रेरक (Enzymes) गायब होतं. त्या एंझायमच्या कमतरतेमुळे रुग्णाच्या शरीरात अनेक बदल होतात. यकृत आणि प्लीहाचा आकार वाढतो, याशिवाय हाडांमध्येही बदल दिसून येतात.
डॉक्टरांनी सांगितले की, अमायराच्या वडिलांच्या अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो वापरून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अमायरावर उपचार करणाऱ्या डॉ. सुनील भट यांनी सांगितलं की, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरात प्लीहा (Spleen) अवयव असतो. हे अवयव मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्तीचं काम करतं. प्लीहा शरीरातील रक्ताच्या पेशींची पातळी नियंत्रित करते. तसेच जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून टाकते.
म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस अत्यंत दुर्मिळ आजार
म्युकोपोलिसॅकरिडोसिस आजाराचा प्लीहावर परिणाम होतो. म्यूकोपॉलीसेकेराइडोसिस (Mucopolysaccharidosis Type-1) हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. हा आजार रुग्णाच्या डोळ्यांवर आणि मेंदूसह शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करतो. हा आजार असणारी बहुतेक मुलांना वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत अपंगत्व येते. त्यानंतर या आजारामुळे मृत्यूही होऊ शकतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा यावरील एक उपाय आहे.
अमायराच्या आईने मानले आभार
बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच्या चार महिन्यानंतर आता अमायराच्या शरीरातील एंझायम सामान्यपणे काम करत आहे आणि तिची तब्येत सुधारत आहे. अमायराच्या आईने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'आम्हाला या आजाराविषयी काहीच माहिती नव्हती. बरेच संशोधन केल्यानंतर डॉ. संजय भट यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अमायरला भारतात उपचारासाठी घेऊन आलो. येथील डॉक्टरांच्या पथकाने खूप मदत केली.'