नवी दिल्ली : भाजपची अधिकृत वेबसाईट (http://www.bjp.org/) हॅक करण्यात आली आहे. वेबसाईटवर आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. परंतु भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जेव्हा वेबसाईट हॅक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलल अँजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ साईटवर दिसत होता. सोबतच व्हिडीओच्या वर आक्षेपार्ह मजकूरही लिहिला होता.
काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनीही याबाबत ट्वीट केलं. "भाईयो और बहनों, जर तुम्ही आता भाजपची वेबसाईट पाहत नसाल तर तुम्ही बरंच काही मिस कराल."
नंतर वेबसाईट सुरुच होत नव्हती आणि एरर येऊ लागला. बराच वेळ हा एरर कायम होता. 26 डिसेंबर, 1995 रोजी या वेबसाईटची नोंदणी झाली होती. तसंच भाजपची वेबसाईट 10 ऑक्टोबर, 2018 पासून अपडेटच झालेली नाही. तर याआधी 20 फेब्रुवारीला छत्तीसगड भाजपची वेबसाईटही हॅक झाली होती.
भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2019 12:45 PM (IST)
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जेव्हा वेबसाईट हॅक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सेलल अँजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ साईटवर दिसत होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -