भाजपचा नवा नारा 'फिर एक बार मोदी सरकार'
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2018 03:46 PM (IST)
2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने "फिर एक बार मोदी सरकार" असा नारा दिला आहे.
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने "फिर एक बार मोदी सरकार" असा नारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या शेवटी फिर एक बार मोदी सरकारचा नारा देण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपचा हा नवा नारा असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. 'अबकी बार मोदी सरकार' हा नारा देत भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निडवणुकांमध्ये प्रचार केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असल्याने लोकांनी भाजपच्या या नाऱ्याला साद देत भाजपला मतदान केले. परिणामी भाजपची केंद्रात एकहाती सत्ता आली. भाजपता सत्तेचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला आत्तापासूनच सुरुवात होत आहे. अमित शाह यांनी हा व्हिडीओ ट्विट करुन प्रचाराला सुरुवात झाल्याचेच संकेत दिले आहेत. काय आहे व्हिडीओमध्ये? अमित शाहांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देशातील नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्व नागरिक नरेंद्र मोदी App डाऊनलोड करून देशाच्या विकासासाठी पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत देणगी देऊ शकता. देशात चांगले रस्ते, उड्डाणपूल, वीज, घरगुती गॅस या सर्वांसाठी मोदीजींना 5 रुपये देणगी देऊन 'न्यू इंडिया' निर्माणासाठी हातभार लावा, असे आवाहन या व्हिडीओद्वारे करण्यात आले आहे.