नवी दिल्ली :  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले असतानाच, रिपाइं मात्र भाजपसोबतच असल्याचा स्पष्टोच्चार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केला आहे.

 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती होणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र दुसरीकडे महापालिका निवडणुकीत भाजप- आरपीय युती होणारच, असा दावा खासदार रामदास आठवले यांनी दिल्लीत बोलताना केला आहे.

 

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपची युती झाली, तर रिपाइं ३५ जागा, आणि जर ही युती झाली नाही, तर रिपाइं भाजपसमोर युतीसाठी ६० जागांची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.