गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कालच 70 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, आज 36 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. पक्षाने आत्तापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.


गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून कोणीही नामांकन अर्ज दाखल केला नव्हता.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातच भाजपने काल आणि आज असे एकूण 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण काँग्रेसकडून एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

 

संबंधित बातम्या

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर