नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे लोकसभा खासदार आणि भाजप नेते वरुण गांधी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाच्या सरकारला घेरताना दिसत आहेत. आता वरुण गांधी म्हणाले की, लखीमपूर खेरी हिंसाचाराला 'हिंदू शीख लढ्या'मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


एका ट्विटमध्ये वरुण गांधी म्हणाले, "लखीमपूर खेरी हिंसाचाराला 'हिंदू शीख लढ्या'मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे. हे केवळ अनैतिक आणि खोटे नॅरेटिव्ह आहे, उलट असा द्वेष निर्माण करणे आणि त्या जखमा पुन्हा उघडणे धोकादायक आहे." ज्या बऱ्या करण्यासाठी एक पिढी लागली आहे. आपण छोटे राजकीय लाभ राष्ट्रीय एकतेच्या वर ठेवू नये."






यापूर्वी गुरुवारी वरुण गांधी यांनी ट्विटरवर लखीमपूर खेरी घटनेचा एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती, ज्यात भाजप नेत्याच्या काफिल्याची एसयूव्ही आंदोलक शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. पीलीभीतचे भाजप खासदार म्हणाले होते, 'व्हिडिओ अतिशय स्पष्ट आहे. आंदोलकांना हत्येद्वारे शांत केले जाऊ शकत नाही. निरपराध शेतकऱ्यांच्या हत्येसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात अहंकार आणि क्रौर्याचा संदेश येण्यापूर्वी न्याय दिला पाहिजे.'


Maharashtra Bandh : लखीमपूर प्रकरणावरून येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक


यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. वरुण गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे पत्र ट्विटरवर शेअर केले होते, ज्यात त्यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती आणि पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची शिफारस केली होती.


12 तासांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक


लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा यांची एसआयटी टीमने सुमारे 12 तास चौकशी केली. सखोल प्रश्नोत्तरानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.