बंगळुरु: भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी कर्नाटकातील येडियुराप्पा सरकारला घरचा आहेर दिला आहे. बंगळुरुतील रुग्णालयामध्ये पैशासाठी 'बेड घोटाळा' करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये किमान 4,065 बेड्स हे फेक नावांनी ब्लॉक करण्यात आले असून त्यासाठी लाच घेण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं. 


खासदार तेजस्वी सूर्या यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, "बंगळुरु महापालिकेच्या रुग्णालयात काही एजंट आणि वॉर रुममधील काही लोक या घोटाळ्यात सामिल आहेत. या ठिकाणी अनेक बेड्स हे लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या नावे बुक केले जातात ब्लॉक केले जातात. नंतर 12 तासांच्या अवधीनंतर लाच घेऊन ते बेड्स इतर रुग्णांना देण्यात येतात. यामध्ये हॉस्पिटलमधील अधिकारी, काही आरोग्य मित्र आणि एजंट लोकांचे साटेलोटे आहे. गेल्या काही दिवसामध्ये अशा एकूण 4,065 तक्रारी आल्या आहेत."


 




कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "तेजस्वी सूर्या यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा मोठा घोटाळा आहे. यामध्ये कोणीही सामिल असो, त्याची गय केली जाणार नाही."


कर्नाटक राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून आणि त्यावरील नियोजनावरून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टेक्निकल अॅडवायजरी कमिटीने राज्यातील दुसऱ्या लाटेबद्दल आगोदरच सरकारला सूचना केल्या होत्या. या सूचना येडियुराप्पा सरकारने गंभीरपणे घेतल्या नाहीत असा आरोप त्यांच्यावर होत आहे.


महत्वाच्या बातम्या :