Ajay Bhatt Viral Video: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनरेगावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. मनरेगाऐवजी नवीन धोरण आणल्याबद्दल आणि योजनेचे नाव बदलल्याबद्दल इंडिया आघाडीकडून जोरदार प्रहार केला जात आहे. नवीन योजनेतून महात्मा गांधींचे नाव वगळले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावर थेट सरकारवर हल्लाबोल केला. काल संसदेत या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली, ज्यामध्ये नैनिताल-उधमपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार अजय भट्ट यांनी थेट नोकरी लागत नसेल, मुलगीचं लग्न होत नसेल जय श्री राम जय जय राम म्हणण्याचा सल्ला दिला. अजय भट्ट यांच्या सल्ल्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर सडकून प्रहार सुरु आहे. आस्थेचा सन्मान असायला हवा, राजकीय तमाशा नाही, अशाही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
प्रत्येक समस्या सुटेल
अजय भट्ट म्हणाले की, "राम हा एक सिद्ध मंत्र आहे, जप जो सर्वकाही साध्य करतो. जर तुमच्या मुलीचे लग्न होत नसेल तर राम राम म्हणा. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर राम राम म्हणा. जर घरात भांडणे होत असतील तर राम राम म्हणा. जर पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर राम राम म्हणा. जर नाते बिघडले असेल तर राम राम म्हणा. जरी गाय दूध देत नसेल तरी राम राम म्हणा. प्रत्येक समस्या सुटेल."
योजनाची नावे बदलून बदल होणार नाही
अजय भट्ट यांच्या सल्ल्यामुळे संसदेत आणि संसदेबाहेर चर्चा सुरू झाली आहे. संसदेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओवरील लोकांनी अजय भट्ट यांना आरसा दाखवला आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. योजनांच्या नावात रामाचे नाव समाविष्ट करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. बदल योजनांची नावे बदलून नाही तर पुरेसा रोजगार देऊन येईल. दुसरीकडे, अजय भट्ट म्हणाले की, "राम, हे राम, श्री राम, जय राम, जय जय राम" हा नऊ शब्दांचा मंत्र महात्मा गांधींनी स्वतः स्वीकारलेला एक सिद्ध मंत्र आहे. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे किंवा आक्षेपार्ह नाही.
इतर महत्वाच्या बातम्या