रायपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आयईडी स्फोट घडवला.
नक्षलवाद्यांनी भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर हल्ला केला. यामध्ये आमदार भीमा मंडावी यांच्यासह पाच जवानांचा मृत्यू झाला. हल्ल्यात ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही चक्काचूर झाली.
छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 11 एप्रिल, 18 एप्रिल आणि 23 एप्रिल रोजी छत्तीसगडमध्ये मतदान पार पडेल.
भीमा मंडावी यांचा ताफा मंगळवारी दुपारी निवडणूक प्रचार करुन श्यामगिरीहून जात होता. नक्षलग्रस्त परिसर असल्यामुळे दंतेवाड्यातील प्रचार 3 वाजताच संपला. भीमा मंडावी बुलेटप्रूफ गाडीत होते. त्यांच्या ताफ्यात सुरक्षा दलाच्याही गाड्या होत्या. त्यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. यात आमदार भीमा मंडावी यांना जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पाच जवानही शहीद झाले.
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बस्तर संभागच्या 12 जागांपैकी भाजपला केवळ दंतेवाड्याच्या जागेवर विजय मिळला होता. भीमा मंडावी यांनी काँग्रेसच्या देवती कर्मा यांचा पराभव केला होता. मंडावी हे विधानसभेत भाजपच्या विधीमंडळ गटाचे उपनेतेही होते.
दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा भाजप आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; आमदाराचा मृत्यू, 5 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2019 06:48 PM (IST)
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बस्तर संभागच्या 12 जागांपैकी भाजपला केवळ दंतेवाड्याच्या जागेवर विजय मिळला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -