नवी दिल्ली : देशात भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री बदलाचे वारे आता मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले आहे का असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जातोय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या दोन दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दोन वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्री बदलाची खेळी भाजपकडून खेळली जातेय का याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. 


 






गेल्या दोन दिवसात मध्य प्रदेशचे मुख्यंमत्री शिवराज चौहान यांनी दुसऱ्यांदा दिल्लीची वारी केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्या आधी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनीही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मध्य प्रदेशसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. 


केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी अमित शाहंची भेट घेतली होती. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलण्यासंबंधी केंद्रीय नेतृत्वाकडून चाचपणी होतेय का असाही सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत पक्ष स्तरावर चर्चा सुरु असून पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 


पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या आधी भाजपकडून वेगवेगळ्या चेहऱ्यांना समोर आणलं जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटकमध्येही मुख्यमंत्री बदलला आहे. आता मध्य प्रदेशमध्येही भाजप तोच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या :