नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली. बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणींसह एकूण 13 नेत्यांविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्याचं समजतं आहे.


मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती पीसी घोष आणि न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या याचिकेवर हा निकाल दिला.

यामध्ये लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह यांच्यासह संघाशी संबंधित एकूण 13 नेत्यांवर यांच्या विरोधात खटला चालवण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले.

पण कल्याण सिंह यांच्याकडे सध्या राजस्थानचे राज्यपाल पदाची जबाबदारी आहे. ते घटनात्मक पदावर असल्याने त्यांच्यावर या पदातून मुक्त झाल्यानंतर खटला चालवण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले होते.

संबंधित बातम्या

बाबरी प्रकरणातील आरोपींचं 'पद्मविभूषण' काढणार का? : ओवेसी


आज रात्रीच अयोध्येला जाणार : उमा भारती


बाबरी मशीद : अडवाणी, जोशी, भारतींवर कट रचल्याचा खटला!


अडवाणी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचं पुढे काय?