पाटीदार नेता हार्दिक पटेलने काँग्रेसला साथ दिली किंवा काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढली तर कुणाला किती जागा मिळू शकतात, याबाबतही जनतेचं मत जाणून घेण्यात आलं.
पाटीदार नेता हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसशी हात मिळवणी केली, तर 40 टक्के मतं काँग्रेसला मिळू शकतात, असं सर्व्हेतून समोर आलं आहे.
सर्व विरोधी पक्ष एकत्र झाल्यानंतरही भाजपच्या मतांवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. हार्दिक पटेल विरोधात असूनही भाजपला 48 टक्के मतं मिळताना दिसत आहेत. तर इतरांना केवळ 3 जागा मिळताना दिसत आहेत.
कुणाला किती जागा मिळणार?
- काँग्रेस+अल्पेश+जिग्नेश+हार्दिक = 62-71
- भाजप- 110-120
- इतर - 3
गुजरात विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल
- भाजप - 120
- काँग्रेस- 43
- राष्ट्रवादी काँग्रेस - 2
- जेडीयू - 1
- रिक्त 15
एकूण - 182