नवी दिल्ली : बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दयाशंकर सिंह यांनी मायावतींवर असंसदीय शब्दात टीका केली होती.
दयाशंकर सिंह यांना तातडीने अटक करा, जर यामुळे उत्तर प्रदेशात हिंसाचार झाला, तर त्याला मी जबाबदार असणार नाही, असं मायावती यांनी राज्यसभेत सांगितलं.
दयाशंकर सिंह यांनी मायावतींवर गंभीर आरोप केले होते. मायावती यांनी काशीराम यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केलीय. मायावती पैसे देऊन तिकीटाची विक्री करतात. असं म्हणत दयाशंकर यांनी असंसदीय शब्दात टीका केली होती.
सिंह यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीही खेद व्यक्त केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर पक्षाकडून तात्काळ कारवाई करण्यात आली.