काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन नाना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाची माहिती देण्यात आली आहे. नाना पटोलेंची 4 जानेवारीला दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी भेट झाली होती. तेव्हाचा त्यांचा पक्षातही प्रवेश झाला होता. पण त्यानंतर म्हणजे तब्बल आठवडाभरानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला.
नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन नाना पटोलेंचं पक्षात स्वागत केलं. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह दिग्गज नेते हजर होते.
नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसंच स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. अखेर 8 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
कोण आहेत नाना पटोले?
- 54 वर्षीय नाना पटोलेंचा जन्म भंडाऱ्यातील शेतकरी कुटुंबात झाला
- शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठं काम, मतदारसंघात नानाभाऊ म्हणून परिचित
- 1990 साली भंडाऱ्यातील सांगडीतून जिल्हा परिषदेवर निवडून गेले
- 1999 पासून सलग तीन वेळा साकोली मतदारसंघातून विधानसभेवर गेले
- काँग्रेसचे उपनेते म्हणूनही काम, 2014 आधी पक्षाच्या धोरणावर नाराज होऊन बाहेर
- भंडारा-गोंदिया मतदारसंघातून 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली
- राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलांचा 1 लाख 49 हजार मतांनी पराभव केला
संबंधित बातम्या