BJP Candidates List : भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपच्या पाचव्या यादीत विविध राज्यांतील 111 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत लोकसभेच्या अनेक जागांवर जुन्या उमेदवारांची तिकिटेही रद्द करण्यात आली आहेत. भाजपने आतापर्यंत लोकसभेच्या 402 जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अजूनही काही जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर व्हायची आहेत. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पक्ष आणखी 12 उमेदवारांची नावे जाहीर करू शकतो.
वरुण गांधींचा पत्ता कट
भाजपच्या पाचव्या यादीतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पिलीभीतचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करणे. वरुण गांधींचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. गेल्या काही वर्षांत वरुण गांधी यांनी सडकून टीका केली होती. शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे भाजपने वरुण गांधी यांना तिकिट दिलं नसल्याचे स्पष्ट झालं आहे.
ड्रामा क्वीन कंगणा निवडणुकीच्या रिंगणात
भाजपने मेरठमधून अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. अरुण गोविल यांनी रामानंद सागर यांच्या समायनमध्ये प्रभू रामाची भूमिका साकारली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून ड्रामा क्वीन कंगना रणौतला उमेदवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आणि महाविकास आघाडी सरकार असताना कंगणाने सातत्याने टीका केली होती. त्यामुळे भाजप कंगनाचा निवडणुकीत वापर करून घेणार हे निश्चित होते.
बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांचा पत्ता कापला
पक्षांतर्गत कलह आणि असंतोष रोखण्यासाठी भाजपला अनेकांचा पत्ता कट करावा लागला आहे. काही जागांवर विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. गाझियाबादमधून माजी लष्करप्रमुख व्हीके सिंह यांच्या जागी आमदार अतुल गर्ग यांना तिकीट दिले आहे. जे मोदी सरकारमध्ये दोन वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. गाझियाबादमधील स्थानिक आमदार सातत्याने व्हीके सिंह यांच्याविरोधात विरोधात असल्याने पक्षात असंतोष वाढत होता. हे थांबवण्यासाठी व्ही के सिंग यांच्या जागी नवा चेहरा आणण्यात आला.
आयाराम पायघड्या घातल्या
भाजपने निष्ठावंताना बाजूला करताना आयाराम पायघड्या घातल्याचे पहिल्या यादीपासून स्पष्ट झालं आहे. या यादीत काँग्रेस किंवा इतर पक्ष सोडून येथे आलेली अनेक नावे आहेत. पिलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून आलेल्या जितिन प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे. झारखंडच्या दुमका जागेवर हेमंत सोरेन यांची मेहुणी सीता सोरेन यांना तिकीट देण्यात आले आहे. सीता यांनी काही काळापूर्वी झारखंड मुक्ती मोर्चा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय पक्षाने नवीन जिंदाल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नवीन जिंदाल यांनी पाचवी यादी जाहीर होण्याच्या काही तास आधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या