BJP Candidate list 2024 : भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही यादी जाहिर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत मोदी सरकारमधील 34 मंत्री पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर 28 महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकही जागा आज जाहीर करण्यात आलेली नाहीत. 


195 जागांवरिल उमेदवार भाजपकडून जाहीर 


भाजप नेते विनोद तावडे यांनी आज 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगर मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. या यादीत दोन माजी मुख्यमंत्र्याची नावे देखील आहेत. 47 जागांवर युवा उमेदवार देण्यात आलेत. तर 28 जागांवर अनुसुचित जातींतील उमेदवार तर 57 जागांवर ओबीसींना उमेदवारी देण्यात येणार आहे. स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढणार आहेत. 


कोणत्या राज्यातील किती उमेदवार जाहिर 



  • उत्तरप्रदेश    - 51

  • पश्चिम बंगाल  -  20 

  • मध्य प्रदेश     - 24

  • गुजरात - 15

  • राजस्थान -15

  • केरळ - 12

  • तेलंगणा -9 

  • आसाम -11 

  • झारखंड - 11

  • छत्तीसगड -11

  • दिल्ली - 5

  • जम्मू काश्मीर - 2

  • उत्तराखंड -3

  • अरुणाचल प्रदेश -2

  • गोवा - 1

  • त्रिपुरा -1

  • अंदमान निकोबार - 1

  • दमण दीव -1


अंदमान निकोबार - विष्णू पडा रे


अरुणाचल पश्चिम - किरण रिजिजू


अरुणाचल पूर्व - तपिर गावो


सिलचर - परिमल शुक्ल वैद्य


गुवाहाटी - बिजुली कलिता


तेजपुर - रणजित दत्ता


नौगाव - सुरेश बोरा


दिबृगड - सर्वानंद सोनावल


छत्तीसगड 


विलापसुर - तोखन साहू 


राजनंदगाव - संतोष पांडे


रायपूर - ब्रिजमोहन अग्रवाल


बस्तर - महेश कश्यप


दादरा नगर हवेली - लालुभाई पटेल


दिल्ली


चांदनी चौक - प्रवीण खंडेलवाल


उत्तर पूर्वी दिल्ली - मनोज तिवारी


बासुरी स्वराज


दक्षिण दिल्ली - रामविर सिंग बिधुडी


उत्तर गोवा


श्रीपाद नाईक


गुजरात 


गांधीनगर - अमित शाह


राजकोट - पुरुषोत्तम रुपाला


पोरबंदर - मनसुख मांडवीय


*नौसारी - सी. आर पाटील


जम्मू काश्मीर


- डॉ. जितेंद्र सिंग


कोडरमाल - अन्नपूर्णा देवी


हजारीबाग - मनीष जैस्वाल


केरळ 


कासरगोड - एम एल अश्विनी


कन्नूर - प्रफुल्ल कृष्ण 


कोझिकोडे - एम टी रमेश


त्रिशुर - सुरेश गोपी


अल्पुझा - शोभा सुरेंद्र 


अटींगल - वी मुरलीधरन


केंद्रिय मंत्री वी मुरलीधरन आणि राजीव चंद्रशेखर लोकसभेच्या रिंगणात


केंद्रीय मंत्री वी. मुरलीधरण आणि राजीव चंद्रशेखर पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. मुरलीधरण अटींगलमधून निवडणूक लढवतील. 


इतर महत्वाच्या बातम्या 


BJP Candidate List: मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?