पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेंबांधणी सुरु आहे. सत्ताधारी एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जदयू सर्वाधिक जागा लढणार आहे. जदूयनंतर भाजप जागा लढेल. नितीशकुमार यांचा पक्ष जदयू 102 जागा लढवेल. भाजप 101 जागांवर निवडणूक लढवेल. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाला 25 जागा मिळू शकतात. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 8 जागा मिळतील. तर उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएम पक्षाला 7 जागा मिळतील. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.

Continues below advertisement

एनडीएचं जागा वाटप आज निश्चित झालं असलं तरी यासंदर्भातील घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. तर, उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे. बिहार मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे.   बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार 243 जागांसाठी मतदान दोन टप्प्यात पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाटणा, मुजफ्फरपुर, दरभंगा, सहरसा, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, लखीसराय, मुंगेर, शेखपुरा, नालंदा, बक्सर आणि भोजपूर या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात होणार मतदान होणार आहे.   

Continues below advertisement

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात जोरदार चुरस आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे एनडीए आणि महागठबंधनच्या घटकपक्षांकडून  जागा वाटप ठरल्यानंतर उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. यावेळी प्रशांत किशोर यांचा जनस्वराज्य पक्ष देखील निवडणुकीत उतरणार आहे.

14 नोव्हेंबरला मतमोजणी 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 6 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर,  मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.  बिहारमध्ये प्रमुख सामना एनडीए आणि महागठबंधनमध्ये आहेत. एनडीएत भाजप, जदयू, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, लोक जनशक्ती पार्टी रामविलास तर महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, सीपीआय (माले) लिबरेशन,  माकप आणि भाकपा, मुकेश साहनी विआयपी हे पक्ष आहेत.