मुंबई: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल काल वाजलं. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. यावर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा टोला त्यांनी लगावला आहे.


संजय राऊत यांनी म्हटलं की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जाऊ शकतात. काल संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला होता. तसंच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली होती.





बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.


Bihar Election Dates 2020: बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर, कोरोना काळातील निवडणुकीसंदर्भात आयोगाच्या मोठ्या घोषणा 


संजय राऊत काल म्हणाले होते की, देशाच्या राजधानीत कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही संसदेचं अधिवेशन घेऊ शकत नाही आणि बिहारसारख्या राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये कोरोना संपला का? हे पाहावं लागेल. सरकारला, तिथल्या राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला वाटलं असेल की कोरोना संपला आणि आम्ही निवडणुका घेतोय तर त्यासंदर्भात तसं जाहीर व्हायला पाहिजे. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील.


Bihar Election : कोरोना काळातील जगातील सर्वात मोठी निवडणूक बिहारची, 'या' आहेत गाईडलाईन्स


बिहारमधील मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्मावर होतं. तिथे अनेकदा गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो. त्यांच्या सरकारविषयी सुप्त राग आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हा प्रचाराचा मुद्दा असावा यासाठी केंद्र आणि बिहार सरकार मिळून त्याच्या आत्महत्येचं राजकारण केलं. जनता दल युनायटेड या पक्षाने सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर प्रचारात आणले आहेत. तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, कामाचे मुद्दे नाही, सुशासनचा मुद्दा नाही, म्हणून मुंबईचे मुद्दे जबदस्तीने प्रचारात आणले आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये पडदा ओढण्याचं काम केलं त्यांनी राजीनामा दिला ते बक्समधून निवडणूक लढत आहेत. हे सगळं आधीच ठरलं होत, त्यानुसार हे नाट्य पुढे चाललं आहे, असंही राऊत यांनी म्हटलं होतं.


Sanjay Raut PC | केंद्र आणि बिहार सरकारकडून सुशांतच्या मृत्यूचं राजकारण : संजय राऊत