Bihar Election Exit Poll 2025 :  18 व्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या (Bihar Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पार पडली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 20 जिल्ह्यांमधील 122 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, 243 जागांसाठी बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. 243 जागांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान, यानंतर एग्जिट पोल समोर आले आहेत. यामध्ये बिहारमध्ये  कोणता पक्ष सर्वात मोठा ठरणार आहे, याबाबतची माहिती पाहुयात. 

Continues below advertisement

नितीश कुमार यांचा जेडीयू ठरणार सर्वात मोठा पक्ष?

बिहार विधानसभा निवडणुकीतील 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाल्यानंतर, एक्झिट पोलचे निकाल आता समोर आले आहेत. मॅट्रिज आयएएनएसच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात एनडीए पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. महाआघाडीला 70 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या पोलनुसार, नितीश कुमार यांचा जेडीयू एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, तर आरजेडी महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

एनडीए: 147-167  जागा

भाजप: 65 ते 73 जागाजेडीयू: 67 ते 75  जागाएलजेपी(आर): 7 ते 9 जागाएचएएम: 4 ते 5 जागाआरएलएम: 1 ते 2 जागा

Continues below advertisement

महाआघाडी किती जागा जिंकणार ?

दरम्यान, मॅट्रिज आयएएनएसच्या एक्झिट पोलनुसार, महाआघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. या एक्झिट पोलनुसार, महाआघाडीत राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. काँग्रेसची संख्या 10 ते 12 जागांपर्यंत मर्यादित आहे.

महाआघाडी - 70 ते 90 जागाराजद - 53 ते 58  जागाकाँग्रेस - 10 ते 12 जागाव्हीआयपी - 1 ते 4 जागाडावे पक्ष -9 ते 14  जागा

2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.

बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई आकडा किती?

बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई संख्या 122 आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (११ नोव्हेंबर) संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 6  नोव्हेंबर रोजी झाले, ज्यामध्ये 18 जिल्ह्यांमधील 121 जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात सरासरी 65.08 टक्के मतदान झाले.

एक्झिट पोलनुसार भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता

एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला दीडशेहून जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 145 ते 163 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Bihar Election : बिहार एक्झिट पोलची आकडवारी समोर, सर्व पोलमध्ये भाजप-एनडीएला सत्ता, तर तेजस्वी यादवांच्या महागठबंधनचा सुपडासाफ