बिहारमधील विधानसभा (Bihar election) निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राजद (RJD) म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत 2020 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 36 जागांवरील उमेदवार बदलून नवी रणनीती आखली आहे. त्यामध्ये, माजी मंत्री तेजप्रताप यादव यांच्या मतदारसंघात देखील दुसराच उमेदवार देण्यात आला आहे. तर, 36 विद्यमान आमदारांचे (MLA) तिकीटही कापले आहे. 

Continues below advertisement

तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदने बिहार विधानसभा निवडणुकासाठी 143 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गतनिवडणुकीत 144 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या राजदने यंदा बहुतांश विद्यमान आमदारांचे तिकीट कापलं आहे. तब्बल 36 विद्यमान आमदारांचे तिकीट पक्षाने कापले, त्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येते. दरम्यान, पक्षाने 41 उमेदवारांना पुन्हा संधी दिली असून त्यामध्ये अलोक मेहता, चंद्रशेखर, युसूफ सलाउद्दीन आणि चंद्रहास चौपाल यांच्या नावाचा समावेश आहे.

जहानाबाद येथील आमदार सुदय यादव यांचे सीट बदलण्यात आले आहेत. सुदय यांना जहानाबादऐवजी कुर्था मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात सर्वात मोठा फेरबदल करताना पक्षाने तेजप्रताप यादव यांच्या मतदारसंघात माला पुष्पम यांना उमेदवारी दिली आहे. रघुनाथपूर येथील विद्यमान आमदार हरीशंकर यादव यांचं तिकीट कापून बाहुबली नेते शहाबुद्दीनचे पुत्र ओसामा यांना निवडणुकीत उतरवलं आहे. तर, धोरय्या येथून आमदार भुदेव चौधरी यांचंही तिकीट कापण्यात आलय. दिनारा येथूनही विद्यमान आमदाराचे तिकीट कापण्यात आलं असून RJD चे युवक प्रदेशाध्यक्ष राजेश यादव यांना संधी देण्यात आलीय.

Continues below advertisement

काँग्रेसच्या यादीची प्रतिक्षा

दरम्यान, बिहार विदानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, इंडिया अघाडीतील पेच सुटलेला नाही. महागठबंधनमधील राजकीय पक्ष काही जागांवर आमने सामने आले आहेत. महागठबंधनमधील काँग्रेस, राजद, व्हीआयप, सीपीआय आमने सामने आले आहेत. हा पेच एकूण 11 जागांवर असल्याची माहिती होती. मात्र, राजदने आज 143 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने हा पेच सुटल्याचं दिसून येत आहे. आता, काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल, हेच पाहावे लागेल. 

पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला 

बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला पार पडणार आहे. एनडीएनं सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजप-जदयू 101-101, लोजपा रामविलास 29, जीतनमराम मांझी यांच्या पक्षाला 6 आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलकेजे पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत. 

हेही वाचा

बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसला धक्का, हेमंत सोरेन यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघ ठरले, पार्टीच्या सचिवांची माहिती