Continues below advertisement

पाटणा : बिहार विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असून भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. बिहारमधील 243 जागंसाठी विधानसभेची निवडणूक संपन्न झाली असून पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यानंतर, आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलमधून (Exit Poll) बिहारमध्ये कोणाचं सरकार बनणार, बिहारची जनता कोणाला कौल देणार, बिहार निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या प्रशांत किशोर (Prashant kishor) यांच्या जनसुराज पक्षाला किती जागा जिंकता येणार, या सर्वांचा अंदाजे कौल समोर आला आहे. त्यानुसार, बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जदयू एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत आहे.

बिहार निवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून एनडीए आघाडीला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. तर, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बिहारच्या जनतेनं नाकारल्याचं स्पष्ट होत आहे. बिहार निवडणुकीसाठी MATRIZE-IANS च्या एक्झिट पोलनुसार, NDA ला 48 टक्के, महाआघाडीला 37 टक्के आणि इतरांना 15 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

Continues below advertisement

प्रशांत किशोर यांनीही वर्तवला होता अंदाज

प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत 240 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार त्यांचा सुफडा साफ होताना दिसून येत आहे. बिहार निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ 2-3 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. दरम्यान, स्वत: प्रशांत किशोर यांनी निवडणुकांपूर्वी भाकीत केलं होतं. त्यानुसार, आमच्या पक्षाचे व्हिजन लक्षात घेत जनतेनं मतदान केल्यास आम्ही 150 जागा जिंकू असं ते म्हणाले होते. मात्र, तसं न झाल्यास 10 जागा जिंकणेही कठीण असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. 

बिहार निवडणूक विविध संस्थांचे एक्झिट पोल सर्वेक्षण

आयएएनएस-मॅटराइजच्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 147-167 जागांवर विजय मिळू शकतो, तर राजद-काँग्रेस महाआघाडी केवळ 70-90 जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे.

CHANAKAYA STRATEGIES च्या अनुसार एनडीए आघाडीला 130-138 जागा जिंकता येतील, तर काँग्रेस महाआघाडीला 100-108 जागांवर विजय मिळेल. इतर पक्ष 3 ते 5 जागांवर यश मिळवतील. त्यामुळे, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला यश मिळणार नसल्याचं दिसून येत आहे.

POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 133-148 जागांवर विजय मिळेल, महाआघाडीा 87-102 जागा जिंकता येतील आणि इतर पक्षांना 3 ते 5 जागांवर समाधान मानाने लागेल.

Poll Dairy च्या एक्झिट पोलनुसार एनडीए एनडीए आघाडीला तब्बल 184 ते 209 जागांवर विजय मिळणार असा अंदाज आहे, तर काँग्रेस महाआघाडीला 32 ते 49 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. इतर मध्ये केवळ 1 ते 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.

Praja Poll Analytics च्या सर्व्हेनुसार एनडीए आघाडीला 186 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे, तर महाआघाडीला 50 जागा जिंकता येतील असे दिसून येते. याशिवाय इतर पक्षांना 7 जागांवर समाधान मानावे लागेल.

TIF Research एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 145-163 जागा जिंकता येतील, तर महाआघाडीला 76 ते 95 जागांवर विजय मिळेल, असे दिसून येते. इतर पक्षांना फक्त 0 ते 1 जागा जिंकता येईल, असा सर्व्हेचा अंदाज आहे.

हेही वाचा

बिहारमध्ये पुन्हा NDA चे सरकार, जनतेचा भाजपला कौल; पहिल्या एग्झिट पोलची आकडेवारी समोर, तेजस्वी यादवांना किती टक्के मतदान?