नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसच्या राज्य प्रभारी बदलले जात आहेत. गुजरातमधील ओबीसी समाजाचे चेहरा बनलेले अल्पेश ठाकोर यांच्याकडे काँग्रेसने बिहार राज्याचं प्रभारीपद दिले आहे. बिहारमधील सध्याची राजकीय स्थिती पाहता, काँग्रेसने अल्पेश ठाकोर यांची प्रभारीपदी नियुक्ती करुन अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
बिहारच्या राजकारणात गेल्या तीन दशकांपासून मागासवर्गीय समाजाचा दबदबा आहे आणि हा दबदबा सुरु झाल्यापासून काँग्रेस बिहारमध्ये सत्तेबाहेर आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्याला बिहारच्या प्रभारीपदी नियुक्त करुन, काँग्रेसने बिहारमध्ये विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
तसेच, दुसरीकडे टीएमसी आणि भाजपच्या द्वेषपूर्ण राजकारण जिथे आहे, त्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने तीन नवे सचिव नियुक्त केले आहेत. बी. पी. सिंह, मोहम्मद जावेद आणि सरत राऊत यांना पश्चिम बंगालचं प्रभारी करण्यात आले आहे.
चल्ला वामशी रेड्डी आणि बी. एम. संदीप यांना महाराष्ट्राचं प्रभारी करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रभारीपदाची जबाबदारी शकील अहम खान यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांना उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश धमानी यांच्याकडे उत्तराखडंचे प्रभारीपद देण्यात आले आहे.
राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर, पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. वरील नियुक्त्या हाही त्याच बदलांचा भाग मानला जात असून, राहुल गांधी हे या बदलांमध्ये नव्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
अल्पेश ठाकोर यांच्याकडे काँग्रेसकडून मोठी जबाबदारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2018 03:40 PM (IST)
रायबरेलीच्या काँग्रेस आमदार आदिती सिंह यांना उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस करण्यात आले आहे. राजेश धमानी यांच्याकडे उत्तराखडंचे प्रभारीपद देण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -