वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी भाषण करण्याची कला शिकत आहेत. बरं झाले ते बोलले, जर बोलले नसते तर मात्र  मोठा भूकंप आला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेस उपाध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर उपहात्मक टीका केली.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "त्यांचे (काँग्रेस) एक युवा नेता आहेत. ते भाषण देण्याचं शिकत आहेत. जेव्हापासून ते बोलण्यास शिकले आहे, बोलणं सुरु केलं आहे, तेव्हापासून माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही. 2009 मध्ये समजायचंच नाही की या पॅकेटच्या आत काय आहे? पण आता समजायला लागलं आहे. बरं झालं ते काहीतरी बोलले. जर बोलले नसते तर मोठा भूकंप आला असता. एवढा मोठा भूकंप आला असता की देश 10 वर्ष तरी त्यातून सावरला नसता.




..तर तुम्ही पाहाच, कसा भूकंप येतो : राहुल गांधी


 

परंतु मला 1.25 कोटी जनतेवर विश्वास आहे. ते माझ्यासोबत आहेत. लोकांचा आशीर्वाद हा देवाचा आशीर्वाद आहे. काँग्रेसचं खरं रुपही सगळ्यांना माहित आहे."

नोटाबंदीचा विरोध करणाऱ्यांचा समाचार

मोदींनी यावेळी नोटाबंदीचा विरोध करणाऱ्यांचाही चांगलाच समाचार घेतला. नोटाबंदी देशातील सर्वात मोठं स्वच्छता अभियान आहे. कोणताही विचार न करता नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला, असं काही जण बोलत आहेत. पण काही नेते काळा पैसा असणाऱ्यांची साथ देतील, याचा मी कधीच विचार केला नव्हता. हे समजण्यास मी अपयश ठरलो, असं मोदी म्हणाले.

मोदी मुख्यमंत्री असताना सहाराने 40 कोटी दिले, राहुल गांधींचा आरोप


 

मनमोहन सिंह, चिदंबरम यांच्यावर टीका

नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही हल्लाबोल केला. "मनमोहन सिंह 1971-72 पासून जवळपास आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कोअर टीममध्ये होते. ते म्हणातात की, ज्या देशात 50 टक्के लोक गरीब आहेत, तिथे अशा प्रकारचं तंत्रज्ञान कसं काम करेल. आता तुम्ही मला सांगा की, मनमोहन सिंह स्वत:चं रिपोर्ट कार्ड देत आहेत की माझं? 50 टक्के गरिबीचा वारसा मी सांभाळत आहे," असं मोदी म्हणाले.

चिदंबरम यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, "आपल्या देशात 50 टक्के गावात अजूनही वीज नाही, तर कॅशलेस कसं करणार, असं चिदंबरम बोलले होते. आता तुम्हीच सांगा हे कोणाचं देणं आहे. मी येऊन खांब काढले का?"

‘मोदी मुर्दाबाद’ म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी खडसावलं!