भोपाळ : माथेफिरु तरुणाच्या तावडीतून तरुणीला तब्बल बारा तासांनंतर सोडवण्यात पोलिसांना यश आलं. माथेफिरूने भोपाळमध्ये तरुणीला एकतर्फी प्रेमातून फ्लॅटमध्ये कैद केलं होतं.अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी या तरुणाची समजूत काढली आणि मुलीची सुटका केली.
मुलगी सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या गळ्यावर थोडी इजा झाली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. शिवाय फ्लॅटच्या दरवाजात पोलीस कर्मचारी आणि या तरुणामध्ये चकमक झाल्यानंतर तरुणाच्या हाताला दुखापत झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रोहित नावाच्या या तरुणाची संबंधित मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. मुलीची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या तरुणाने कात्रीने हल्ला केला. हा तरुण फ्लॅटमधून व्हिडीओ कॉलिंगने बातचीत करत होता.
भोपाळमधील मिसरोद भागातील ही घटना आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याचंही बोललं जातं. सकाळी सहा वाजता तो फ्लॅटमध्ये घुसला आणि त्याने आतून कडी लावली. म्हणजे तब्बल बारा तासांपेक्षा जास्त काळ तरुणीला त्याने ओलीस ठेवलं होतं.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण उत्तर प्रदेशमधील अलीगडचा राहणारा आहे. शिवाय त्याने पत्रकारितेचं शिक्षण केलेलं असून तो मुंबईत मॉडेलिंग करतो. तरुणीला मॉडेलिंग आणि सिनेमात काम देण्याचं स्वप्न दाखवत तो तिला मुंबईला घेऊन गेला. मात्र तरुणीला वास्तव समजताच ती भोपाळला आपल्या घरी माघारी परतली.
दरम्यान, याच वर्षी 27 फेब्रुवारी रोजी रोहित नावाच्या या तरुणाने तरुणीचं अपहरणही केलं होतं. जबरदस्तीने तो घरात घुसला आणि तरुणीला घेऊन गेला. पोलिसांनी मुलीची सुटका करुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र पुन्हा एकदा या तरुणीने तरुणीला त्रास देणं सुरु केलं.
तब्बल 12 तासांनंतर माथेफिरुच्या तावडीतून तरुणीला सोडवण्यात यश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 05:16 PM (IST)
रोहित नावाच्या या तरुणाची संबंधित मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. मुलीची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर या तरुणाने कात्रीने हल्ला केला. हा तरुण फ्लॅटमधून व्हिडीओ कॉलिंगने बातचीत करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -