Bharat bandh LIVE : पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद

शेतकर्‍यांच्या घोषणेनुसार शुक्रवारी म्हणजेच आज भारत बंद राहील. अनेक राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2021 08:56 AM

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच आज शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या...More

पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद

अखिल भारतीय किसान सभा संघर्ष समन्वय समिती, जन आंदोलन संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भारत बंदचा नारा असून पालघर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज पहाटे पासून कासा चारोटी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.