उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यावरुन सट्टेबाजारात अंदाज लावले जात आहेत. गुजरातच्या सट्टेबाजारानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार येईल आणि 200 ते 203 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
सपा-काँग्रेसला 125 ते 130 जागा मिळू शकतात, तर बसपाला 60 ते 62 जागा मिळतील, असं गुजरातच्या सट्टेबाजांचं म्हणणं आहे.
गुजरातच्या सट्टेबाजांनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला 40 ते 45, काँग्रेसला 20 ते 23 आणि बसपाला 3 ते 4 जागा मिळतील.
पंजाबमध्ये काट्याची टक्कर
गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असं सट्टेबाजांचं म्हणणं आहे. इथे भाजपला 22-24, काँग्रेस 14-16 आणि आपला 3-5 जागा मिळतील, असं अंदाज सट्टेबाजांनी बांधला आहे.
मात्र सट्टेबाजांनुसार पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर होईल. आपला 52-55, काँग्रेस 50-53 तर अकाली दल आणि भाजप युतीला 10-12 जागा मिळू शकतात, असं सट्टेबाजांचा अंदाज आहे.
मुंबईचा सट्टेबाजार काय सांगतो?
मुंबईतील सट्टे बाजारानुसार उत्तर प्रदेशात भाजपला 195-200 जागा मिळतील. तर सपा-काँग्रेस 120 ते 125, बसपा 64-67 अशी स्थिती असेल, असं मुंबईतील सट्टेबाजांचं म्हणणं आहे.
मुंबईच्या सट्टेबाजांनुसार उत्तराखंडमध्ये भाजपला 42-45, काँग्रेस 20-23, तर बसपाला 3-4 जागा मिळतील.
गोव्यातही पुन्हा भाजपचं सरकार येईल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहेत. मुंबईतील सट्टेबाजांनुसार गोव्यात भाजपला 22-24, काँग्रेसला 14-16, आपला 3-5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मुंबईच्या सट्टेबाजांनुसार पंजाबमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. सट्टेबाजांनुसार आपला 50-52, काँग्रेस 50-52 आणि अकाली दल-भाजप युतीला 12 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या :