Powers of FPOs : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत आर्थिक फायद्यांचा 10वी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर त्यांच्या भाषणात शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) च्या पाच वैशिष्ट्यांची यादी केली.
PM मोदी म्हणाले की, भारतातील "लहान शेतकऱ्यांची वाढती क्षमता" एकत्रित करण्यात FPOs ची मोठी भूमिका आहे. ते पुढे म्हणाले, "छोटे शेतकरी जे पूर्वी एकटे राहत असत, त्यांच्याकडे आता एफपीओच्या रूपानं मोठे अधिकार आले आहेत."
पंतप्रधान मोदींनी सूचीबद्ध केलेल्या पाच शक्तींची यादी :
- अधिक चांगल्या सौदेबाजीच्या संधी, ज्याला पीएम मोदींनी "बार्गेनिंग पॉवर" असं संबोधलं
- मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्याची संधी.
- व्यवसायाला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग वापरणं आणि समाविष्ट करणं
- पीएम मोदी म्हणाले की, चौथी शक्ती म्हणजे जोखीम व्यवस्थापन (Risk Management). "एकत्रितपणे, तुम्ही (शेतकरी) आव्हानांचे अधिक चांगल्या प्रकारे मूल्यांकन करू शकता आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी मार्ग तयार करू शकता," असं मोदींनी स्पष्ट केलं होतं.
- पंतप्रधानांच्या मते, FPOs ची पाचवी शक्ती विकसित होत असलेल्या बाजाराच्या ट्रेंडनुसार बदलण्याची क्षमता आहे.
PM-KISAN योजनेअंतर्गत, देशभरातील 10 कोटी लाभार्थी कुटुंबांना 20,000 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एका कार्यक्रमात 10 वा हप्ता जारी केला. पात्र शेतकरी कुटुंबांना योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. जो 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिला जात असतो. पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात.
PM-KISAN योजना फेब्रुवारी 2019 मध्ये जाहीर करण्यात आली होती आणि नवीनतम हप्त्यांसह, योजनेअंतर्गत प्रदान केलेली रक्कम जवळपास 1.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पीएम-किसान योजनेंतर्गत 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी हस्तांतरित
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच, पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे, 1 जानेवारीला देण्यात येणार आहे. 1 जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1.6 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेत आपले नाव पाहण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल.
1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या.
2. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल.
3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा.
4. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
5. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
काय आहे पीएम किसान योजना?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना ही केंद्राची योजना असून याचा सर्व खर्च केंद्र सरकारकडून केला जातो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा