Beglauru Bomb Threat बंगळुरु : बंगळुरु शहराच्या पोलीस आयुक्तांना 30 नोव्हेंबरला एक धमकीचा ईमेल आला आहे. त्या मेलमध्ये जैश-ए- मोहम्मदच्या व्हाइट कॉलर टेरर टीमनं केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि शहराच्या विविध भागातील मॉल्स  ओरिअन मॉल, लुलू मॉल, फोरम साऊध मॉल आणि मंत्री स्क्वेअर येथे बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात आली आहे. ईमेल मोहित कुमार नावावरुन पाठवण्यात आला होता, त्यात  7 वाजता स्फोट करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

Continues below advertisement

बॉम्ब स्फोटाची धमकी मिळताच पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 173 नुसार केस दाखल करण्यात आली आहे.  सर्व संवदेशनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीत  10 नोव्हेंबरला कार ब्लास्ट झाला होता. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. दोन्ही मध्ये व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलचा उल्लेख असल्यानं सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. 

मोठ्या नेटवर्कचा भांडाफोड

एनआयएनं काही दिवसांपूर्वी मोठ्या नेटवर्कचा भांडाफोड केला होता. ज्यामध्ये पाच डॉक्टरांचा समावेश होता. मुझम्मिल गनई, अदील अहमद राठर, मुझफ्फर अहमद राठर, शाहीन शाहिद आणि उमर उन नबी यांनी  26 लाख रुपये जमवून देशातील विविध शहरांमध्ये सिरिअल ब्लास्टचा कट रचल्याचा आरोप आहे. यातील काही आरोपी फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापाठीत काम करत होते. 10 नोव्हेबंरच्या स्फोटात ह्युंदाई कार चालवणारा  व्यक्ती देखील त्यांच्यापैकी एक होता. 

Continues below advertisement

बंगळुरुला या वर्षाच्या सुरुवातीला धमक्यांचे अनेक मेल आले होते.  शहरातील काही शाळांना धमक्यांचा मेल आला होता. जे नंतर फेक असल्याचं समोर आलं होतं. सायबर ट्रेलचा वापर करत पोलिसांनी मुख्य आरोपी रेने जोशिल्डा यांना अटक केली होती. जो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. जो अहमदाबादच्या सेंट्रल जेलमध्ये बंद होता. सातत्यानं धमक्या येत असल्यानं सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा हाय अलर्टवर आहेत.