या प्रकरणी सलीम चमडेवाले नावाच्या तस्कराला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या घरातून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलं, त्या घरात भूत असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे घरात कोणीही जात नव्हतं. तसंच घरात लाईट नसल्यानं रात्रीच्या वेळी नेमकं काय चालतं हे कोणालाही समजत नव्हतं.
सलीम आपल्या कारमधून प्राण्यांची शिंगं आणि इतर वस्तू आणायचा आणि घरात ठेवायचा. यानंतर कारमधून हा सर्व माल मुंबईला जायचा तिथून चीनमध्ये पाठवला जात असे, अशी माहिती आहे.
दरम्यान या सर्व वस्तूंचं मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांनी वनखात्याशी संपर्क साधला आला असून यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.