नवी दिल्ली : देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 2022मध्ये भारत अंतराळात मोठी भरारी घेईल. 2022 मध्ये भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सांगितलं.


भारतीय वैज्ञानिकांनी अंतळात संशोधनात केलेल्या कामगिरीचा गौरव मोदींनी आपल्या भाषणात केला. मोदी म्हणाले की, भारतीय वैज्ञानिकांनी एकाच वेळी 100 उपग्रह अवकाशात सोडले. मी देशातील नागरिकांना खुशखबर देतो की, अंतराळ क्षेत्रात भारत वेगात प्रगती करत आहे. 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनापूर्वी भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल.


देशातील एक मुलगा किंवा मुलगी अंतराळात जाईल आणि तिथे आपला तिरंगा दिमाखात फडकवेल. अंतराळात जाण्याचं स्वप्न 2022पर्यंत पूर्ण करण्यावर मोदींनी यावेळी भर दिला. पुढे मोदी म्हणाले की, मंगळ यानाच्या यशस्वी प्रेक्षपणानंतर भारतीय वैज्ञानिकांना देशाची ताकद जगाला दाखवून दिली आहे. भारतीय उपग्रह मनुष्याला अंतराळात घेऊन नक्की जाईल. त्यावेळी अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.


चंद्रयान-1 भारताचं पहिलं चंद्र अभियान होतं, जे इसरोने ऑक्टोबर 2008मध्ये यशस्वीरित्या पार पाडलं. तर मंगलयान अभियान 20104मध्ये सुरू केलं.


संबंधित बातम्या


गरीब कुटुंबासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'ची घोषणा


स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे


नेहरु, मनमोहन, वाजपेयी ते मोदी, लाल किल्ल्यावर कुणाचं किती मिनिटे भाषण?